टीम AM : राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं आहे. लोकसभा सचिवालयाने आज याबाबतचं पत्र जारी केलं. मानहानीच्या एका खटल्यात सूरतच्या जिल्हा न्यायालयानं राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणी त्यांना वरच्या न्यायालयात दाद मागण्यासाठी तीस दिवसांच्या मुदतीसह जामीनही मंजूर झाला आहे. मात्र लोकप्रतिनिधींना दोन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी शिक्षा झाल्यास, त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याचा नियम आहे. या नियमानुसार लोकसभा सचिवालयाने गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द केलं आहे.
राहुल गांधी सातत्यानं संसदेत आणि संसदेच्या बाहेरही सरकार विरोधात बोलत असल्यामुळेच त्यांचा आवाज दाबण्यासाठी ही कारवाई केल्याची टीका काँग्रेस पक्षाने केली आहे. पक्षाचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी पत्रकार परिषदेत हा आरोप केला.