शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत 20 तारखेला सुनावणी

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर येत्या 20 तारखेला सुनावणी होणार आहे. 

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ येत्या 23 जानेवारीला संपत आहे. हा कायदेशीर पेच संपेपर्यंत त्यांना मुदतवाढ द्यावी अशी मागणी ठाकरे गटानं निवडणूक आयोगाकडे केली होती. 

त्याबाबत काल झालेल्या सुनावणीत दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद करण्यात आला. आता पुढील सुनावणी शुक्रवारी म्हणजे 20 जानेवारीला होणार आहे.