मुंबई : झी स्टुडिओज् आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाच्या टीझरमध्ये पोलीस आणि नक्षलवादी यांच्यातील चकमक, पळापळी यात दिसत होती. त्यामुळे नेमके या चित्रपटात काय पाहायला मिळणार, याची उत्सुकता लागून होती.
30 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित या चित्रपटात सयाजी शिंदे, नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर यांच्या भूमिका आहेत.
झी स्टुडिओज् आणि नागराज पोपटराव मंजुळे यांनी एकत्र येऊन मराठी सिनेसृष्टीला ‘फँड्री’, ‘सैराट’, ‘नाळ’ असे चित्रपट दिले आहेत. त्यांच्या चित्रपटात नेहमीच वैविध्यपूर्ण आणि अनन्य साधारण विषय हाताळले जातात. या चित्रपटाबद्दल नागराज मंजुळे म्हणतात, झी स्टुडिओज् सोबत काम करण्याचा अनुभव हा नेहमीच अनोखा असतो.