अंबाजोगाई : शहरातील रोटरॅक्ट क्लब ऑफ अंबाजोगाईच्या वतीने पहिल्यांदा भव्य पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त जणांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
हा महोत्सव दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी दुपारी 3 ते संध्याकाळी 7 पर्यंत तालुका क्रीडा संकुल, दूध डेअरीसमोर, यशवंतराव चव्हाण चौक येथे होणार असून यासाठी प्रवेश शुल्क 50 रुपये (एक पतंग व दोरी) असे ठेवण्यात आले आहे.
या पतंग महोत्सवात मनोरंजनासाठी संगीताची साथ व पोटासाठी चटपट्या पदार्थांची देखील साथ ठेवली आहे, या महोत्सवात 3 फूट उंची खालील लहान मुलांसाठी प्रवेश अगदी मोफत असून प्लास्टिकचे पतंग वापरणे टाळावे व धारदार मांजाचा वापर करू नये, असे आयोजकांकडून कळवण्यात आले आहे.