अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या ‘अ‍ॅॅम्पाथॉन’ ला डॉक्टरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘अ‍ॅम्पा’ च्या माध्यमातून डॉक्टरांच्या सर्वांगीण प्रश्नांची सोडवणूक : डॉ. राहुल धाकडे

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील सर्व माध्यमांच्या डॉक्टरांची एकत्र संघटना बांधण्याचे काम अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनने केले आहे. गेल्या सहा महिन्यात या संघटनेचा प्रभाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. डॉ. राहुल धाकडे यांनी वैद्यकिय क्षेत्रातील सर्व विषयांतील डॉक्टरांना एकत्र करुन ‘अ‍ॅॅम्पा’ संघटनेची स्थापना केली. या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. डॉक्टर बांधवांच्या सर्व प्रकारच्या अडीअडचणी जाणून घेवून त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

डॉक्टरांमधील सर्व प्रकारच्या कलागुणांना वाव देवून त्यांच्यातील सुप्त गुण पटलावर आले पाहिजेत, हा संघटनेचा संकल्प आहे. त्यानुषंगाने आज शुक्रवार दि. 13 जानेवारी रोजी डॉक्टरांसाठी धावण्याची स्पर्धा आयोजित केली. ‘अ‍ॅॅम्पाथॉन’ च्या माध्यमातून शहरातील डॉक्टरांची अनोखी स्पर्धा पार पडली.

अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या माध्यमातून संघटनेची स्थापना झाल्यानंतर जवळपास सहा महिन्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची व लोकाभिमुख उपक्रम घेण्यात आले. शिक्षक दिनाच्या निमित्ताने वरिष्ठ डॉक्टर मंडळींचा सन्मान सत्कार, ‘डॉक्टरर्स डेे’ च्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम तसेच प्रत्येक दिवसाचे महत्व जाणून त्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. डॉ. राहुल धाकडे यांनाच सांस्कृतिक कार्याचा टच असल्याने ते ‘अ‍ॅॅम्पा’ च्या अगोदर वेगवेगळे उपक्रम आयोजित करत होते. ‘अ‍ॅॅॅॅम्पा’ च्या माध्यमातून डॉक्टर बांधवांमध्ये नवचैतन्य निर्माण व्हावे आणि विरंगुळा व्हावा, या भुमिकेतून वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. ‘अ‍ॅॅम्पा’ च्या वतीने शुक्रवार दि. 13 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजता डॉक्टरांची धावण्याची स्पर्धा ‘अ‍ॅॅम्पाथॉन’ आयोजित करण्यात आली. 

या माध्यमातून शहरातील अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी, दंतरोग, नेत्ररोग व वेगवेगळ्या विषयातील डॉक्टरांना एकत्र करुन त्यांच्यात धावण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली. यावेळी या स्पर्धेला हिरवा झेंडा दाखविण्याचे काम राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, संपादक अभिजित गाठाळ, परमेश्वर गित्ते, नागेश औताडे, मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय अंबेकर यांच्यासह ‘अ‍ॅॅम्पा’ चे संस्थापक अध्यक्ष डॉ. राहुल धाकडे, डॉ.श्रीनिवास रेड्डी, डॉ.सुधीर धर्मपात्रे, डॉ.अनिल भुतडा, डॉ. विठ्ठल केेंद्रे, डॉ. योगिनी नागरगोजे, डॉ. अरुणा केंद्रे, डॉ. विशाल भुसारे, डॉ. हर्षा काळे, डॉ. सुनिता तोंडगे, डॉ. इम्रान अली, डॉ. ऋषिकेश घुले, यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक डॉ. अरविंद शिंदे, द्वितीय डॉ. निशिकांत पाचेगांवकर, तृतीय डॉ. बाळासाहेब हाके, महिला डॉक्टर प्रथम डॉ. सुनिता तोंडगे, द्वितीय डॉ. अश्विनी भुसारे, तृतीय डॉ. प्रिया नागरगोजे आणि विशेष म्हणजे शेवटच्या स्थानी जे स्पर्धक राहिले त्यामध्ये डॉ. जयंत गायकवाड यांच्यासोबतच विशेष सहभाग घेतलेले डॉ. सुनिल नांदलगावकर व डॉ. संजय सोळुंके यांचा सन्मान करण्यात आला. तसेच या स्पर्धेत जे जे स्पर्धक सहभागी झाले त्यांनाही सन्मानपत्र व मेडल देण्यात आले. याचा बक्षीस वितरण सोहळा लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत आणि विशेष कार्यक्रमाद्वारे केला जाणार आहे. 

यावेळी बोलताना डॉ. नरेंद्र काळे म्हणाले की, ‘अ‍ॅॅम्पाथॉन’ च्या माध्यमातून शहरातील डॉक्टर बांधवांचे आरोग्य सशक्त आणि सुदृढ होण्यास मदत होणार आहे. कारण डॉक्टर बांधव हे रुग्णांची काळजी घेत घेत स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करतात. परंतू डॉक्टर राहुल धाकडे व त्यांच्या सर्व सहकार्‍यांनी अभिनंदनीय असा उपक्रम आयोजित करुन सर्व डॉक्टरांची मोट बांधून त्यांच्यातील आत्मविश्वास हा जागृत करुन त्यांच्यात नवचैतन्य निर्माण केले आहे. यावेळी डॉ.राहुल धाकडे यांनी प्रास्ताविक केले. तर या प्रसंगी परमेश्वर गित्ते, डॉ. बाळा हाके, डॉ. अरुणा केंद्रे यांनीही मनोगत व्यक्त करुन या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ‘अ‍ॅॅम्पा’ चे सर्व सदस्य सहभागी झाले. यावेळी डॉ. राहुल धाकडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा सत्कार उपस्थितांनी करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.