अंबाजोगाई : बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी अतिवृष्टीनं झालेल्या पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिले आहेत.
अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचं नुकसान झालं असून, जिल्हाधिकारी शर्मा यांनी प्रत्यक्ष बांधावर जावून अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधून नुकसानीबाबत माहिती घेतली. गाव पातळीवर तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्याकडून संयुक्त पंचनामे करण्यात येणार असून, तालुका स्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी पीक नुकसानीचे पंचनामे होण्यासाठी कार्यवाही करतील, असं यावेळी सांगण्यात आलं.