मुंबई : गेल्या जून ते ऑगस्ट या कालावधीत अतिवृष्टीमुळं बाधित झालेल्या परंतु निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून 755 कोटींचा निधी वितरीत करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.
निकषात न बसणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात शासन निर्णय काढून जिल्ह्यांना निधी वितरित करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्याप्रमाणं आज मदत व पुनर्वसन विभागानं 755 कोटी रुपयांच्या निधीचं औरंगाबाद, अमरावती आणि पुणे विभागातील नऊ जिल्ह्यांना वितरण करण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.