कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा अन्यायकारक निर्णय राज्य सरकारने मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करणार : राजेसाहेब देशमुख

अंबाजोगाई : कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा अन्यायकारक निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याचे समाज माध्यमातून कळत आहे. यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदांच्या शाळांवर ही ‘टांगती तलवार’ असून राज्य सरकारच्या या अन्यायकारक निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढली आहे. तरी कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा अन्यायकारक निर्णय राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा या प्रश्नावर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून विविध पध्दतीचा अवलंब करून तीव्र जनआंदोलन करेल, प्रसंगी बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागास कुलूप ही ठोकण्यात येईल, असा गंभीर इशारा बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी दिला आहे.

या प्रश्नावर बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे की, राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळांबाबत शिक्षण विभागाकडून आढावा घेतला जात आहे. विभागीय पातळीवरून हालचालींना वेग आल्याने शिक्षकांचा विरोधही वाढला आहे. कमी पटसंख्येतील शाळांची चार ऑक्टोबरपर्यंत माहिती औरंगाबाद उपसंचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडून मागवली होती. प्राप्त माहितीनुसार, अनेक जिल्ह्यांकडून अशी माहिती आली असून, अशा शाळांची संख्या वाढल्याचे सांगण्यात येते. कमी पटसंख्या असलेल्या सरकारी शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, त्याविरोधात विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. त्याचवेळी 0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळांची यादी वाढत जात आहे. मराठवाड्यात अशा शाळांची संख्या एक हजारांपेक्षा अधिक असल्याचे कळते, यातील तब्बल 216 शाळा या एकट्या बीड जिल्ह्यातील आहेत. या 216 शाळेत 432 शिक्षक कार्यरत आहेत. या अन्यायकारक निर्णयामुळे ग्रामीण भागातील पालकांना त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाची चिंता सतावत आहे. 

यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदांच्या शाळांवर ही ‘टांगती तलवार’ असून राज्य सरकारच्या या अन्यायकारक निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि पालकांची चिंता वाढली आहे. तरी कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा अन्यायकारक निर्णय राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा या प्रश्नावर काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून विविध पध्दतीचा अवलंब करून तीव्र जनआंदोलन करेल, प्रसंगी बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागास कुलूप ही ठोकण्यात येईल, असा गंभीर इशारा बीड जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी दिला आहे.