मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाला निवडणूक आयोगाने आज चांगलाच झटका दिला असून ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह आता गोठवण्यात आलं आहे. शिवसेना नावही या दोन्ही गटाला वापरता येणार नाही, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपाचा असल्याची माहिती आहे. केवळ अंधेरी पोटनिवडणुकीकरता हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत नव्या चिन्हासाठी दावा करण्याचे निर्देशही आयोगाकडून देण्यात आले आहेत.
शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय द्यायचे आहेत, अशी माहिती मिळाली आहे.