शंखी गोगलगायींमुळे झालेल्या नुकसानापोटी तीन जिल्ह्यात 98 कोटी 58 लाख रुपये नुकसान भरपाई

मुंबई : लातूर, बीड आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यात शंखी गोगलगायींमुळे शेतपिकांच्या 33 टक्क्यांपेक्षा अधिक झालेल्या नुकसानापोटी 98 कोटी 58 लाख 80 हजार रुपये नुकसान भरपाई राज्य सरकारने मंजूर केली आहे. 

हा निधी विभागीय आयुक्तांमार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यात येणार आहे. 

यापैकी बीड जिल्ह्याला 2 कोटी 59 लाख 92 हजार रुपये, उस्मानाबाद जिल्ह्याला 40 कोटी 63 लाख 97 हजार रुपये, तर लातूर जिल्ह्याला 11 कोटी 91 लाख 72 हजार रुपये वितरित करण्यात येत आहे. याबाबतचा शासननिर्णय जारी करण्यात आला आहे.