राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उद्या अंबाजोगाईच्या दौऱ्यावर

अंबाजोगाई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उद्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार, दि.19 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11.15 वाजता लातूर येथून अंबाजोगाई जि. बीडकडे प्रयाण. दुपारी 12.00 वाजता शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह, ता. अंबाजोगाई येथे आगमन व जिल्हा सैनिक कल्याण मंडळ व रेडक्रॉस सोसायटी यांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठकीसाठी राखीव. दुपारी 1.30 ते 3.00 पर्यंत भोजनासाठी राखीव. दुपारी 3.00 वाजता शासकीय विश्रामगृह, अंबाजोगाई येथून योगेश्वरी देवी मंदिराकडे प्रयाण.

दुपारी 3.05 वाजता योगेश्वरी देवी मंदिर अंबाजोगाई येथे दर्शनासाठी राखीव. दुपारी 3.15 वाजता शासकीय वाहनाने परळीकडे प्रयाण. दुपारी 4.20 वाजता परळी वैजनाथ मंदिर, परळी येथे आगमन व दर्शनासाठी राखीव. दुपारी 4.40 वाजता परळी वैजनाथ मंदिर येथून शासकीय विश्रामगृह परळीकडे प्रयाण. दुपारी 4.45 वाजता शासकीय विश्रामगृह परळी येथे आगमन राखीव व मुक्काम.

शनिवार, दिनांक 20 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 9 वाजता शासकीय विश्रामगृह, परळी जिल्हा बीड येथून लातूरकडे प्रयाण, असा राज्यपालांचा दौरा आहे.