कॉ.गंगाधर आप्पा बुरांडे स्मृतीदिनानिमित्त राजेंद्रसिंह राणा यांचे व्याख्यान

अंबाजोगाई : बीडचे माजी खासदार कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त राजेंद्रसिंह राणा (रॅमन मॅगेसेस विजेते, स्टॉक होम जलवायू पुरस्कार विजेते, पर्यावरणवादी कार्यकर्ते) यांचे व्याख्यान होणार आहे. आद्यकवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दि.30 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता करण्यात आले आहे.

कॉ. गंगाधअप्पा बुरांडे यांनी आपले आयुष्य तत्वनिष्ठा ,त्याग ,सदाचार व सेवाभाव हे जीवनमुल्य जपत कष्टकरी व शोषित वंचित माणसांच्या उत्कर्षासाठी घालवले. तोच वारसा जपत काळाची पावले ओळखून कॉ. गंगाधर अप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठाण माती ,पाणी आणि माणूस केंद्रस्थानी मानून शाश्वत विकासाच्या वाटेवर क्रतिशील वैचारीक वाटचाल करत आहे.

कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या स्मृती दिनानिमित्त आजपर्यंत अंबाजोगाईकरांनी अनेक मान्यवरांना व्याख्यानासाठी निमंत्रित करण्यात आलेले आहे. यामध्ये माजी न्यायमूर्ती बी.जी.कोळसे पाटील, माजी पोलीस आयुक्त सुरेश खोपडे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड, अच्युत गोडबोले, विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार ,राम पुनियानी , स्वामीनाथन आयोगाचे पी.साईनाथ, अनिसच्या मुक्ता दाभोलकर यांचे व्याख्यान अंबाजोगाई येथे झालेले आहे. त्या अनुषंगाने कॉ.अप्पांच्या जन्मशताब्दी वर्षातील ११ व्या स्मृती व्याख्यानास संबोधीत करण्यासाठी जलतज्ञ येत आहेत. 30 सप्टेंबर रोजी होणार्‍या स्मृती दिनानिमित्त राजेंद्रसिंह राणा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असून यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहाण्याचे आवाहन कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती प्रतिष्ठाणच्या वतीने करण्यात आले आहे.