अंबाजोगाई : देश क्षयमुक्त व्हावा याकरीता शासकीय व खासगी वैद्यकीय यंत्रणांनी एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. या मोहिमेत इंडियन मेडिकल असोसिएशनचे सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही अध्यक्ष डॉ. राजेश इंगोले यांनी दिली.
इंडियन मेडिकल असोसिएशन व आरएनटीसीपी यांच्या वतीने शहरातील सर्व वैद्यकीय व्यावसायिकांची निरंतर वैद्यकीय शिक्षण परिषद शनिवारी आयोजित करण्यात आली होती. उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. कमलाकर आंधळे, डॉ. ज्ञानेश्वर निपटे यांची प्रमुख उपस्थिती होती. जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ. संजय सूर्यवंशी, अधीष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, डॉ. कमलाकर आंधळे, डॉ. ज्ञानेश्वर निपटे व स्वाराती रुग्णालयातील क्षयरोग तज्ज्ञ डॉ. अनिल मस्के यांनी मार्गदर्शन केले. सर्वात जास्त क्षयरोगी नोंद करणारे इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य डॉ. संदीप थोरात, डॉ.सुधीर धर्मापात्रे यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिव डॉ.विजय लाड, कोषाध्यक्ष डॉ. सचिन पोतदार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब लोमटे ,तालुका क्षयरोग अधिकारी डॉ.अमोल चव्हाण ,प्रकल्प समन्वयक महेश कोळी, लक्ष्मीकांत खडके, शैलेश देशपांडे यांनी प्रयत्न केले.