आर्यवैश्य समाजाचे संघटन मजबुत होणे काळाची गरज – नंदकुमार गादेवार

समाजभूषण नंदकुमार गादेवार यांचा ह्रद्य सत्कार सोहळा

अंबाजोगाई : आर्यवैश्य समाजाचे आजघडीला अनेक सामाजीक, आर्थिक, शैक्षणिक, प्रश्न आहेत. समाजातील गोरगरीब मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी काम करत आहे. वर्षातले 365 दिवस मी समाज बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील असून त्यासाठी आर्य वैश्य समाजाचे संघटन मजबुत होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आर्यवैश्य महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष समाजभूषण नंदकुमार गादेवार यांनी केले. समाजभूषण नंदकुमार गादेवार यांचा माजलगाव येथील रुद्रवार गार्डन येथे आर्यवैश्य समाज बांधवांच्या वतीने ह्दय सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देतानां ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर्यवैश्य समाज मंडळाचे तालुकाध्यक्ष श्रीकांत रुद्रवार हे होते तर व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष गजानन डुबे, जिल्हा कार्याध्यक्ष महेश रूद्रवार, समन्वयक विकासराव डुबे, राजश्रीताई गादेवार, महिला जिल्हाध्यक्षा वंदना पारसेवार, महिला तालुकाध्यक्षा संध्या कोसलगे, उपाध्यक्ष सत्यप्रकाश गडम, सचिव सुभाष रुद्रवार, कोषाध्यक्ष रवीकिरण गडम, सहसचिव अजित भावठाणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी समाज बांधवांच्या वतीने सत्काराला उत्तर देताना नंदकुमार गादेवार म्हणाले की, आर्यवैश्य समाजाचे संघटन मजबुत होणे ही काळाजी गरज आहे.जे का रंजले-गांजले त्यासी म्हणे जो आपुले या उक्तीप्रमाणे समाजातील आर्थिकदृष्ट्या मागे असलेल्या समाज बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एक दिलाने काम करणे आवश्यक आहे. नगरेश्वर मंदीर व मंगल कार्यालयाचा प्रश्न लवकरच सोडविणार आहे. तसेच पुणे येथे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या आर्यवैश्य समाजातील मुलांसाठी हॉस्टेल सुरु करणार आहोत. तिरुपती बालाजी येथे समाजबांधवांसाठी भक्तनिवास बांधण्याचा मानस आहे, समाजातील गरजु विद्यार्थ्यांना सुमारे 350 कोटी रुपयांचे आर्थिक मदत शैक्षणिक बाबीसाठी केली आहे. जीवनज्योती विमा योजनेच्या माध्यमातून समाजबांधवांचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत अशी ग्वाही नंदकुमार गादेवार यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुमीत रुद्रवार यांनी केले. यावेळी समन्वयक अभय कोकड, अंजली भावठाणकर, संध्या कोसलगे, वंदना पारसेवार,गजानन डुबे यांची समायोचित भाषणे झाली. मानपत्राचे वाचन आणि बहारदार सुत्रसंचालन अशोक वाडेकर यांनी करुन उपस्थितांचे आभार रुपेश गडम यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आर्यवैश्य समाज मंडळ आणि आर्य वैश्य महिला मंडळ यांनी पुढाकार घेतला.