अंबाजोगाई : आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मोफत वसतिगृह प्रवेश योजना राबवण्यात येत आहे. त्याअनुषंगानं प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प औरंगाबाद अंतर्गत येणाऱ्या औरंगाबाद, जालना, बीड आणि लातूर या चार जिल्ह्यातील 14 वसतिगृहामध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना तालुका स्तरावर आठवीपासून पुढील प्रवेशाकरिता आणि जिल्हा स्तरावर 11 वी पासून नंतरच्या शिक्षणाकरता शासकीय वसतिगृहात पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
याचा संबंधितांनी लाभ घ्यावा, असं आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी केलं आहे.