‘अंबाजोगाई डायग्नोस्टिक सेंटर’ च्या वतीने ‘ओपीजी एक्स – रे’ सुविधा उपलब्ध

अंबाजोगाई : अंबाजोगाई व परीसरातील दंतवैद्यांनी  एकत्र मिळून ‘अंबाजोगाई डायग्नोस्टिक सेंटर’ या नावाने डिजिटल ओपीजी सेंटर सुरू केले आहे. या सेंटरच्या माध्यमातून जबड्याच्या हाडाचे, दाताचे, सायनसचे उच्च गुणवततेचे एक्स – रे  काढता येतील. उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरून खालच्या व वरच्या जबड्याची हाडे, दात, जबड्याची सांधे, कर्करोग, गाठी, फ्रॅक्‍चर, अक्कल दाढीचे रोग, टाळु, दात व मुखाचे व्यंग इ. यांच्याशी संबंधित अतिशय सुस्पष्ट एक्स – रे घेता येईल. 

संपूर्ण बीड जिल्ह्यात डेंटिस्टनी मिळून यशस्वीरित्या चालू केलेले हे पहिलेच सेंटर आहे. याचा फायदा दंतरोग तज्ञ, कान- नाक – घसा तज्ञ, अस्थिरोग तज्ञ,  कर्करोग तज्ञ, दंतव्यंगोपचार तज्ञ, अपघात विभाग इ. ठिकाणी रोग निदान व उपचारासाठी होईल. या महत्त्वपूर्ण वैद्यकीय सेवेमुळे गरजु रूग्णांना यासाठी लातुरला जायची गरज नाही. 

महाराष्ट्र राज्य दंत परिषदेचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. हर्षा काळे यांच्या हस्ते आज मशीन व उपकरणांचे पुजन करून हे सेंटर कार्यान्वित करण्यात आले. हे सेंटर अस्तित्वात आणण्यासाठी डॉ. प्रवीण जोशी, डॉ. ऋृशीकेष घुले, डॉ. भगवान तोंडे, डॉ. अंजली रेड्डी, डॉ. मनोज वैष्णव, डॉ. रमण दळवी, डॉ. उदय सोनी, डॉ. मयुर बिदरकर यांच्यासह अंबाजोगाई, केज, धारूर येथील दंतवैद्यांनी विशेष प्रयत्न केले. अंबाजोगाई डायग्नोस्टिक सेंटर एसबीआय बँकेसमोर, घुगे हॉस्पिटल शेजारी, प्रशांत नगर, येथे सुरू करण्यात आले आहे.