उपाध्यक्षपदी डॉ. मनोज वैष्णव तर सचिवपदी डॉ. विठ्ठल केंद्रे
अंबाजोगाई : शहरात मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनची स्थापना करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. राहुल धाकडे तर सचिवपदी डॉ. विठ्ठल केंद्रे यांची सर्वानुमते निवड होवून नुतन कार्यकारिणी निवडण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे सर्वस्तरांतून स्वागत होत आहे.
अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (ॲम्पा) ची स्थापना करण्यात आली. या संघटनेमध्ये अंबाजोगाई तालुका व शहरातील सर्व पॅथीच्या डॉक्टरांचा समावेश आहे. या संघटनेच्या स्थापनेसाठी पुढाकार घेऊन डॉ. नरेंद्र काळे यांनी संघटनेबद्दल आणि नोंदणी बाबत संकल्पना मांडली. सर्व डॉक्टरांनी त्यास पाठींबा दिला.
अंबाजोगाईत पहिली डॉक्टरांची संघटना स्थापन करण्यात आली. या मध्ये सर्व वैद्यकीय शाखांचे जवळपास 200 डॉक्टर्स बांधवांनी सहभाग व संघटनेचे सदस्यत्व घेतले. संयोजक डॉ. नरेंद्र काळे यांच्या अध्यक्षतेखाली नोंदणीकृत सदस्यांमधून पहिली कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. राहुल धाकडे, उपाध्यक्षपदी डॉ. मनोज वैष्णव, सचिवपदी डॉ. विठ्ठल केंद्रे, कोषाध्यक्षपदी डॉ. महेश ढेले, सहसचिवपदी डॉ. शितल सोनवणे, तर सदस्य म्हणून डॉ. सुधिर धर्मपात्रे, डॉ. सुलभा पाटील, डॉ. मनिषा पवार, डॉ. योगिनी नागरगोजे, डॉ. इम्रान अली, डॉ. शिवाजी मस्के, डॉ. ऋषिकेश घुले, डॉ.विशाल भुसारे यांची निवड करण्यात आली.
यावेळी डॉ. नरेंद्र काळे यांनी संघटनेच्या घटनेचे जाहीर वाचन करून सर्वांची सहमती घेतली. या बैठकीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी डॉ. नितीन चाटे, डॉ. राजेश इंगोले यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आपल्या निवडीबद्दल संघटनेच्या सर्व सभासद डॉक्टर्स बांधवांचे आभार व्यक्त करित नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. राहुल धाकडे म्हणाले की, सर्व डॉक्टर्स बांधवांचा सन्मान आणि प्रतिष्ठा राखण्यासाठी, व्यवसायाचे हित जोपासण्यासाठी व सहकाऱ्यांना वेळोवेळी प्रोत्साहन देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून आपण सर्वांना सोबत घेऊन कार्यरत राहणार आहोत, सर्व शाखांच्या वैद्यकीय सेवांना सन्मान प्राप्त करून देवूत, डॉक्टर या नावाखाली डॉ. नरेंद्र काळे यांच्या संकल्पनेतून एकत्र येण्यासाठीच या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे, संघटनेची लवकरच शासनाकडे अधिकृत नोंदणी होईल. अशा संघटनेची अंबाजोगाईत प्रथमच स्थापना होणे ही एक ऐतिहासिक घटना आहे, अशी माहितीही नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. राहुल धाकडे यांनी दिली. यावेळी डॉ. एन. पी. देशपांडे, डॉ. ज्योती देशपांडे, डॉ. नवनाथ घुगे, डॉ. हाश्मी, डॉ. हर्षा काळे, डॉ. नांदगावकर आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. उपस्थितांचे आभार डॉ. विठ्ठल केंद्रे यांनी मानले.