अंबाजोगाई : बीड जिल्हा ॲथेलॅटिक्स संघटना आणि गोल्डन स्पोर्टस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा ॲथेलॅटिक्स चाचणी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला. या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार संजय दौंड यांनी झंडी दाखवून केले.
प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी उपनगराध्यक्ष बबन लोमटे, रणजित लोमटे, दत्ता सरवदे, जेष्ठ क्रीडा मार्गदर्शक शारदाप्रसाद साहू, शिवकुमार निर्मळे, अविनाश बारगजे, तालुका क्रीडास्पर्धा समन्वयक दत्ता देवकते यांची प्रमुख उपस्थिती होती.
सुरुवातीला मान्यवरांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. श्रीफळ वाढवून क्रीडा साहित्याचे पूजन केले.
यावेळी चांगले आरोग्य हीच मोठी संपत्ती असल्याचे संजय दौंड यांनी सांगितले. राजकिशोर मोदी यांनी क्रीडा संस्कृती जोपासण्याचे आवाहन केले. क्रीडा संकुलासाठी सहकार्य करण्याचे अश्वासन माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी दिले. प्रारंभी शिवकुमार निर्मळे यांनी प्रास्ताविक केले. दिनेश पवार, अंगद केंद्रे, प्रविण देशमुख यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू सरवदे यांनी केले.
शंभर मीटर धावणे स्पर्धेचा प्रारंभ मान्यवरांनी हिरवी झंडी दाखवून केला. यावेळी धावणे, फेकी, उड्या या मैदानी क्रीडा चाचणी स्पर्धा दिवसभर घेण्यात आल्या.