अंबाजोगाईत अपघाताची मालिका सुरूच : डिवायडर बसविण्याची मागणी
अंबाजोगाई : अंबाजोगाईलगत असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून काल दिनांक 25 एप्रिलला रात्री 10 च्या सुमारास पुन्हा एकदा अपघात घडला आहे. अंबाजोगाई – लोखंडी सावरगाव रस्त्यावर सायली लॉन्ससमोर ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव तुषार कोपले असं आहे.
तुषार कोपलेंचे लोखंडी सावरगाव जवळ हॉटेल आहे. रात्री हॉटेल बंद करून घराकडे येत असताना सायली लॉन्ससमोर ट्रॅव्हल्सने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात तुषार यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, दोन दिवसांपासून अंबाजोगाईलगत जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर अपघाताच्या घटना घडत आहेत. महामार्गाचा रस्ता अरुंद आणि रस्त्याच्या मधोमध डिवायडर नसल्याने अपघात घडत आहेत. लोकांचे जीव वाचवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आणि डिवायडर बसविण्यासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे, अशी भावना सामान्य जनता व्यक्त करित आहे.