रमजान : मोदींच्या इफ्तार पार्टीस उत्स्फूर्त प्रतिसाद, मुस्लिम – हिंदू बांधवांची उपस्थिती

अंबाजोगाई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीस मुस्लिम – हिंदू बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिनांक ‌‌25 एप्रिलला सोमवारी जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक विद्यालय, गुरुवार पेठ येथे ही इफ्तार पार्टी आयोजित केली होती.

यावेळी राजकिशोर मोदी यांच्या समवेत आमदार संजय दौंड, माजी आमदार पृथ्वीराज साठे, एम. ए. हकीम, तौफिक भाई, समियोद्दीन खतीब, इस्माईल गवळी पत्रकार अ. र. पटेल, हाजी महमूद, अनिस अन्सारी, खालेद चाऊस, जमील भाई, फताउल्ला हाश्मी, खिलाफत अली, प्रकाश सोळंकी, वसंत चव्हाण, रिकबसेठ सोळंकी, ताराचंद शिंदे, विलास जाधव यांच्यासह मुस्लिम – हिंदू बांधव उपस्थित होते.

राजकिशोर मोदी हे मागील 32 वर्षांपासून सामाजिक उत्तरदायित्व व मानवतेच्या दृष्टिकोनातून शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रस्थानी आहेत. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही सर्व मुस्लिम समाजातील बांधवांसाठी रोजा इफ्तारीचे आयोजन करण्यात आले होते. दोन वर्षाच्या कालखंडानंतर यावर्षी पवित्र रमजान महिन्यात आपण या समाजाचे काही तरी देणं लागतो या उदारमतवादी व पवित्र आशा हेतूने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या इफ्तार पार्टीस राजकिशोर मोदी यांच्यावर प्रेम करणाऱ्या हजारों मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली.  

इफ्तार पार्टीत मनोज लखेरा, गणेश मसने, धम्मा सरवदे, बालाजी शेरेकर, सुनील वाघळकर, पत्रकार मुशीर बाबा, जावेद गवळी, शय्येद ताहेर, हकीम लाला, शेख मुक्तार, मझर भाई , शेख जावेद, मूनवर भाई, गफार भाई, शेख रफीक, संतोष शिनगारे, दिनेश भराडीया, सुनिल व्यवहारे, सचिन जाधव, अमोल मिसाळ, राणा चव्हाण, भीमसेन लोमटे, विजय रापतवार यांच्यासह अनेक हिंदू – मुस्लिम बांधव उपस्थित होते.