अंबाजोगाई तालुक्यातील डोंगरपिंपळा येथे घडली घटना
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका आठवर्षीय बालिकेवर 23 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ‘त्या’ आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील डोंगरपिंपळा गावात दिनांक 19 मार्चला दुपारी 3 च्या सुमारास घरासमोर खेळत असताना घरात बोलावून एका आठवर्षीय बालिकेवर नराधम आरोपी किरण राजाभाऊ शेरकर (वय 23) रा. डोंगरपिंपळा याने बळजबरीने अत्याचार केला. यानंतर त्याने बालिकेला भयभीत करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या.
या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरिल आरोपीला पोलीसांनी शनिवारी रात्रीच ताब्यात घेतले. रविवारी पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळे अंबाजोगाई तालुका हादरुन गेला आहे.