गणेशोत्सवानिमित्त मिरवणुक देखावा स्पर्धेचे आयोजन

अंबाजोगाई : नगरपरीषदेच्या वतीने यावर्षी गणेशोत्सवा निमित्त ‘मिरवणुक देखावा – 2019′ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत शहरातील सर्व गणेश मंडळांनी सहभागी व्हावे असे आवाहन नगराध्यक्षा रचनाताई मोदी,उपनगराध्यक्षा सविताताई लोमटे, मुख्याधिकारी डॉ. सुधाकर जगताप, विषय समित्यांचे सर्व सभापती, सर्व पक्षीय नगरसेवक, नगरसेविका यांच्या वतीने करण्यात येत आहे.

नगरपरीषदेच्या वतीने देण्यात आलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, शहरात गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात व शांततेत सांस्कृतिक चळवळ म्हणून साजरा केला जातो. शहरात पन्नासहून अधिक गणेश मंडळ “श्रीं” ची प्रतिष्ठापना करतात. या मंडळात अनेक तरूण, युवक पदाधिकारी असतात. हे पदाधिकारी शहराच्या सामाजिक क्षेत्रात कायमच कार्यरत असतात. या युवक पदाधिका-यांच्या कलागुणांना वाव मिळावा. तरूण पिढीला विधायक दिशा मिळावी. या भूमिकेतून नगरपरीषद गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी स्पर्धा आयोजित करते. त्यामुळे यावर्षीही नगरपरीषदेच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शहरातील सर्व गणेश मंडळांसाठी खुली आहे. या स्पर्धेत सहभागी होणा-या गणेश मंडळांना कोणतेही स्पर्धा सहभाग शुल्क (एण्ट्री फिस) हे आकारले जाणार नाही. मिरवणुक देखावा स्पर्धेत सहभागी होणा-या गणेश मंडळांनी “सामाजिक संदेश” देणारे विषय आपल्या मिरवणुक देखाव्यातून मांडावेत असे अपेक्षीत आहे. कोणताही एक सामाजिक संदेश देणारा समाज प्रबोधनपर, पर्यावरणपुरक, स्वच्छता, जलसंवर्धन, वृक्षारोपन, जनजागृतीपर आदी विषय घेवून मिरवणुक देखावा तयार करावा. मिरवणुकीत पारंपारीक वाद्यांचा वापर करावा. डॉल्बीचा, डिजेचा वापर करू नये, मिरवणुक संचलनात शिस्त असावी, लेझीम पथक, ढोलपथक यांना प्राधान्य द्यावे. दिलेल्या वेळेत सादरीकरण करावे.

स्पर्धेत सहभागी स्पर्धक गणेश मंडळांतील प्रथम विजेत्यांस 5,000/- रूपये रोख पारीतोषीक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय विजेत्यास 3000/- रूपये रोख पारीतोषीक, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तर तृतीय विजेत्यास 2000/- रूपये रोख पारीतोषीक,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तसेच या स्पर्धेत सहभागी होणा-या इतर तीन स्पर्धक गणेश मंडळांना प्रोत्सहनपर पारीतोषिक म्हणून रोख 1000/- रूपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते गणेश मंडळांना सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी स्पर्धक गणेश मंडळांच्या मिरवणुक देखाव्यांचे परीक्षण हे तज्ञ परीक्षकांकडून करण्यात येणार आहे. परीक्षक स्पर्धेसाठी दिलेल्या सामाजिक संदेश
देणा-या मिरवणुक देखाव्यांचे परीक्षण व योग्य गुणांकन करून स्पर्धेचा निकाल जाहीर करतील. तज्ञ परीक्षकांनी दिलेला निकाल हा सर्व स्पर्धकांसाठी अंतीम व बंधनकारक राहील. तरी अंबाजोगाई शहरातील सर्व गणेश मंडळांनी नगरपरीषदेच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित मिरवणुक देखावा स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन
नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.