मुलींच्या शिक्षणासाठी आई धावली मॅरेथॉन ; अंबाजोगाईच्या रमाबाई यांची देशभर चर्चा, सरन्यायाधीशांनी घेतली दखल…!

टीम AM : मुलांच्या उज्वल भविष्यासाठी आणि शिक्षणासाठी आई कष्ट उपसत असते. अंबाजोगाई येथील एक आई मुलींच्या शिक्षणासाठी चक्क मॅरेथॉन स्पर्धेत धावली आणि देशभर हा विषय चर्चिला गेला. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी झालेल्या स्पर्धेची दखल आता देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली आहे. रमाबाई रणवीर यांना राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने भरीव मदत केलीय.

देशभरातील माध्यमांनी या घटनेचं वार्तांकन केलं. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने सदर महिलेला मदत करण्याचा हेतूने महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मार्फत बीड जिल्हा विधी प्राधिकरणाशी संपर्क साधला. त्यानंतर बीड जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव वहाब सय्यद यांनी रणसिंग यांच्याशी संपर्क साधत त्यांना बीड मधील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे बोलावून घेतलं.

प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण दिनेश सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली रमाबाई रणसिंग व त्यांच्या दोन्ही मुलींना कपडे, बूट, चप्पल, शैक्षणिक साहित्य आदी भरीव स्वरूपाची मदत प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आली. न्यायापालीकेच्या या औदार्याचं सध्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here