टीम AM : बीड जिल्हा रुग्णालयात 1 ऑगस्ट रोजी ‘सीझर’ शस्त्रक्रियेदरम्यान 19 वर्षीय संध्या सूरज गायकवाड यांच्या पोटात सर्जिकल हातमोजे आणि कागद राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शस्त्रक्रियेनंतर घरी गेल्यानंतर पोटात तीव्र वेदना सुरू झाल्याने तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला.
गंभीर प्रकृतीमुळे संध्या यांना पुण्यातील ‘ससून’ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे पुन्हा शस्त्रक्रिया करून पोटातील हातमोजे आणि कागद बाहेर काढण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असून त्या मृत्यूशी झुंज देत आहेत. या प्रकरणी संबंधित महिला डॉक्टर आणि उपस्थित वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या असून, चौकशीनंतर दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.



