शासकीय कर्मचाऱ्यांसाठी ‘खुशखबर’ : महागाई भत्त्यात वाढ, तब्बल सात महिन्यांची थकबाकीही मिळणार…!

टीम AM : सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील महागाई भत्त्याचा दर 58 टक्क्यांवरुन वाढवून 60 टक्के करण्याचा यावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती. वित्त विभागाने 18 ऑगस्ट 2026 रोजी आदेश काढत महागाई भत्ता 60 टक्के करण्यात आल्याचं सांगितलं आहे.

जानेवारी 2026 ते जुलै 2026 या कालावधीमधील थकबाकीसह सात महिन्यांची थकबाकी ऑगस्ट महिन्याच्या वेतनामध्ये रोखीने मिळणार आहे. महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती जशी आहे तशीच लागू असेल, असं शासन निर्णयामध्ये म्हटलेलं आहे. मंगळवार, दि. 18 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या उपसचिव सुनिता हजारी यांच्या स्वाक्षरीने वित्त विभागाने हा शासन निर्णय काढला आहे. या आदेशानुसार राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 1 जानेवारी 2026 पासूनची वाढ होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here