केंद्रीय मंत्र्यांशी चर्चेनंतर सोनम वांगचुक यांचा उपोषणाचा निर्णय मागे : आंदोलन सुरूच राहील – अभिजीत दिपके

टीम AM : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आपले उपोषण मागे घेतले आहे. सोनम वांगचुक हे कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत 28 जूनपासून आमरण उपोषणावर होते. शुक्रवारी गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा आणि पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी आपले उपोषण सोडल्याची माहिती समोर आली आहे.

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत स्पष्ट केलं की, सोनम वांगचूक यांनी उपोषण संपवलं असलं तरी जंतर – मंतरवरील शांततापूर्ण आंदोलन सुरूच राहील.

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “सोनम सरांनी 26 दिवसांचं उपोषण संपवल्याबद्दल आम्हाला दिलासा वाटतो. त्यांच्या असामान्य धैर्याबद्दल आणि त्यागाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी संपूर्ण देशाचं लक्ष या प्रश्नाकडे वेधलं. त्यांचं आयुष्य देशासाठी अत्यंत मौल्यवान आहे.”‌याचबरोबर त्यांनी स्पष्ट केलं की, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी मान्य होईपर्यंत कॉकरोच जनता पार्टीचे जंतर – मंतरवरील आंदोलन सुरूच राहणार आहे.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कायम

अभिजीत दिपके यांनी पुन्हा एकदा केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर राजकीय आणि नैतिक जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. ‘नीट’ पेपर लीक प्रकरणात जबाबदारी स्वीकारून त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी भूमिका कॉकरोच जनता पार्टी ने कायम ठेवली आहे. यामुळे सोनम वांगचूक यांच्या उपोषणाची सांगता झाली असली तरी आंदोलनाचा पुढील टप्पा आता जंतर – मंतरवर सुरू राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here