टीम AM : अंबाजोगाई शहरातील सावता माळी चौक परिसरात राहणाऱ्या एका बारावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 10) रात्री घडली असून आज सकाळी उघडकीस आली.
पूनम मेघराज दहिफळे (वय 17) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती मूळ उमरेवाडी (ता. धारुर) येथील रहिवासी होती. शिक्षणासाठी ती अंबाजोगाई येथे किरायाच्या घरात राहत होती.
प्राथमिक माहितीनुसार, अभ्यासाच्या तणावातून पूनमने हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.



