सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या बर्थडेचं चाहत्यांना ‘रिर्टन गिफ्ट’, ‘राका’ सिनेमातील धडकी भरवणारा लुक समोर…!

टीम AM : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतला सुपरस्टार’ अभिनेता अल्लू अर्जुन याचा आज वाढदिवस. त्याच्या वाढदिवसाचं औचित्य साधून चाहत्यांना एक मोठं सरप्राईज मिळालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या चित्रपटाची चर्चा रंगली होती, त्या सिनेमाचा फर्स्ट लुक आता समोर आला आहे.

आज 8 एप्रिल रोजी अल्लू अर्जुन आपला वाढदिवस साजरा करत आहे. या खास निमित्तानं निर्मात्यांनी चित्रपटाचे शीर्षक पोस्टर प्रदर्शित केलं. या पोस्टरमध्ये अल्लू अर्जुन एका अशा रूपात दिसत आहे, जो त्याचा लुक आजवर कधीही दिसला नाही.

‘राका’ च्या पहिल्या पोस्टरमध्ये अल्लू अर्जुन पूर्णपणे केस नसलेल्या, टक्कल असलेल्या लुकमध्ये दिसत असून त्याच्या डोळ्यात राग पाहायला मिळतोय. तसंच या पोस्टरमध्ये एक हिंस्र प्राण्यासारखा नखांचा भाग दाखवण्यात आला असून, अल्लू अर्जुनचा हा लुक एखाद्या काल्पनिक पात्रासारखा वाटत आहे. हा चित्रपट केवळ ॲक्शन नसून त्यात फँटसी आणि थ्रिलरचा तडका असणार असल्याचं म्हटलं जात आहे.

‘जवान’ फेम ब्लॉकबस्टर दिग्दर्शक अ्टली या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. तर या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अल्लू अर्जुन आणि दीपिका यांची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सन पिक्चर्स (Sun Pictures) या संस्थेद्वारे या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे.

दरम्यान, हा चित्रपट जवळपास 700 कोटींहून अधिक बजेटमध्ये बनवला जात असून तो भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक असेल, अशी चर्चाही रंगली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here