टीम AM : अंबाजोगाई शहरातील रिंग रोडवर तथागत चौक परिसरात आज भीषण अपघात झाला. ट्रकच्या जोरदार धडकेत दीनदयाळ बँकेचे वरिष्ठ अधिकारी सुदर्शन टाक यांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सुदर्शन टाक हे आपल्या स्कूटीवर जात असताना भरधाव ट्रकने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस तपास सुरू आहे.



