खळबळजनक : ‘स्वाराती’ च्या निवासी डॉक्टरची आत्महत्या

टीम AM : अंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणारे डॉ. मंदार दाभाडे यांनी चनई परिसरातील रोहिदास नगर येथे भाड्याच्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून, डॉ. दाभाडे यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, तरुण व होतकरू डॉक्टरच्या अशा अचानक जाण्याने वैद्यकीय क्षेत्रात तसेच स्थानिक पातळीवर हळहळ व्यक्त केली जात आहे.