टीम AM : अंबाजोगाई तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे उपाध्यक्ष शिवाजी वामन मुरकुटे यांचं गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दुःखद निधन झाले. अंबाजोगाईहून आपल्या मुरकुटवाडी गावाकडे परतत असताना गिरवली ते पूस दरम्यान रस्त्यावर उभ्या असलेल्या एका टिप्परला त्यांच्या दुचाकीने मागून जोरदार धडक दिली.
शिवाजी मुरकुटे यांनी काल सायंकाळी तहसीलदार विलास तरंगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभात सहभाग घेतला होता. सत्कार आटोपून ते आपल्या गावी परतत असताना, मार्गावर उभ्या टिप्परला दुचाकी धडकून हा अपघात झाला. त्यांच्या निधनाने अंबाजोगाई तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेत आणि मुरकुटवाडी परिसरात तीव्र शोक व्यक्त होत आहे.



