अंबाजोगाईचा राहुल दराडे रुपेरी पडद्यावर ! ‘कलवरी’ चित्रपट झाला प्रदर्शित, राजेश्वरी खरातची प्रमुख भूमिका

टीम AM : अंबाजोगाईचा युवक राहुल दराडे आता थेट रुपेरी पडद्यावर झळकला असून, अभिनेता म्हणून त्याच्या कारकिर्दीची दमदार सुरुवात झाली आहे. प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्री राजेश्वरी खरातसोबत तो ‘कलवरी’ या नव्या मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसत आहे. ग्रामीण वातावरण, लग्नाच्या परंपरा आणि प्रेमकहाणी यांचा सुंदर संगम असलेला हा चित्रपट 28 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला.

‘कलवरी’ हा चित्रपट ग्रामीण भागातील लग्नसंस्कृती, रूढी आणि त्यामागील नातेसंबंधांचे बारकावे उलगडतो. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा, याच भावविश्वात गुंफलेली कथा प्रेक्षकांना स्वतःची वाटावी, अशा पद्धतीने मांडण्यात आली आहे. राजेश्वरी खरातची प्रभावी उपस्थिती आणि राहुल दराडेची ताज्या दमाची अभिनयशैली यामुळे चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

अंबाजोगाईतील तरुण कलाकार राहुल दराडेने पहिल्याच चित्रपटात प्रभावी कामगिरी बजावली असल्याने स्थानिक पातळीवर त्याचे कौतुक होत आहे. ग्रामीण संस्कृतीचे वास्तव दर्शन घडवणारा ‘कलवरी’ हा चित्रपट पाहण्यासारखा ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here