नगरपरिषद निवडणूक : 2 डिसेंबरला मतदान, आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जारी केले आदेश

टीम AM : अंबाजोगाई नगरपरिषद निवडणूक – 2025 अनुषंगाने 2 डिसेंबर 2025  मंगळवार रोजी  मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाचा दिवस शांततेत आणि सुलभतेने पार पडावा, मतदारांची गैरसोय होऊ नये तसेच परिसरात अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी अंबाजोगाई शहरातील आठवडी बाजार त्या दिवशी बंद ठेवण्याचे आदेश बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जारी केले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, शहरातील व्यापारी, बाजार समिती व विक्रेत्यांनी प्रशासनाशी सहकार्य करून 2 डिसेंबर रोजीचा आठवडी बाजार पूर्णपणे बंद ठेवावा. निवडणूक प्रक्रियेदरम्यान अनुशासन, शांतता आणि कायदा  -सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी पुढे येण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here