लाडकी बहीण योजना : पती किंवा वडील हयात नसल्यास आता ‘ही’ कागदपत्रे पुरेशी, वाचा…!

टीम AM : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेत ई – केवायसीदरम्यान पती किंवा वडिलांचे आधारकार्ड देणे आवश्यक असल्याने अनेक महिलांची मोठी अडचण झाली होती. पती, वडील हयात नसल्यास त्यांचे आधारकार्ड कसे द्यावे, याबाबत लाडक्या बहिणींना प्रश्न पडला होता. मात्र, ती अडचण आता दूर झाली आहे. आता अशा महिलांसाठी शासनाने संबंधित व्यक्तीचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे.

दरम्यान, या सुविधेत संबंधित लाभार्थी महिलांनी ई -‌ केवायसी करून त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविकांकडे जमा करावी. त्यानंतर शहानिशा करून त्यांना लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे संबंधित लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांना आता ई – केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. अपात्र महिलांना वगळण्यासाठी आणि गरजू महिलांनाच नियमितपणे लाभ मिळावा, यासाठी हा निर्णय घेतला आहे. ई – केवायसीची 31 डिसेंबरपर्यंत मुदत आहे. ई – केवायसीसाठी पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक बंधनकारक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here