निवडणुकीच्या धामधूमीत विनोद पोखरकर यांची सामाजिक बांधिलकी : सर्वत्र होतंय कौतुक…!

टीम AM : अंबाजोगाई नगरपरिषदेच्या निवडणुकीची जोरदार धग सर्वत्र जाणवत असताना उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जीवापाड प्रयत्न करत आहेत. अशातच प्रभाग क्रमांक 4 मधील युवानेते विनोद पोखरकर यांनी निवडणुकीच्या धावपळीतून वेळ काढत गरजू रुग्णासाठी रक्तदान करत समाजसेवेचे वेगळे उदाहरण ठेवले आहे.

‘स्वाराती’ रुग्णालयात एका रुग्णाला तातडीने रक्ताची गरज असल्याची माहिती मिळताच विनोद पोखरकर यांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेत रक्तदान केले. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

प्रभाग क्रमांक 4 मधून त्यांच्या आई कांताबाई सिद्रामअप्पा पोखरकर या निवडणुकीत भाजप प्रणित आघाडीकडून उमेदवार आहेत. निवडणूक रणधुमाळीतसुद्धा विनोद पोखरकर यांनी समाजसेवा प्रथम मानल्याने त्यांची ‘खऱ्या अर्थाने समाजहिताची भावना असलेला युवानेता’ अशी ओळख अधिक दृढ झाली आहे.

यापूर्वीही सामाजिक उपक्रम, मदतकार्य आणि विविध सेवाभावी कार्यातून त्यांनी जनतेचा विश्वास जिंकला आहे. त्यामुळे अंबाजोगाई शहरात त्यांची ‘सच्चा समाजसेवक’ म्हणून ओळख अधिक ठळक होत आहे.

रक्तदान करून समाधान : विनोद पोखरकर

आज अचानक एका रुग्णाला रक्ताची गरज असल्याचा कॉल आला. क्षणभर विचार केला आणि वाटलं निवडणूक येतील – जातील, पण अशा वेळी मदत न करणं चूक ठरेल. कर्तव्यापेक्षा कोणाच्या डोळ्यातलं पाणी पुसणं हिच खरी सेवा आहे… दत्त महाराजांनी शिकवलंय, अशा भावना युवानेते विनोद पोखरकर यांनी व्यक्त केल्या.

‘स्वाराती’ रुग्णालयात तातडीने रक्ताची गरज असल्याची माहिती मिळताच डॉ. विनय, डॉ. विशाल आणि डॉ. अविनाश यांच्याशी संपर्क करीत त्यांनी माझे 71 वे रक्तदान करून समाजसेवेची परंपरा कायम ठेवली. रक्ताचा पूर्ण स्टॉक संपला आहे, ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की रक्तदान करावे, असे आवाहनही विनोद पोखरकर यांनी केले आहे.