टीम AM : ‘स्वाराती’ रुग्णालयातील गेल्या वर्षभरापासून बंद असलेली ‘सिटी स्कॅन’ मशीन अखेर आज सुरु झाली आहे. अकोला येथून आवश्यक जुना पार्ट उपलब्ध झाल्याने ही मशीन पुन्हा कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या माहितीला अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे यांनीही दुजोरा दिला आहे.
‘सिटी स्कॅन’ मशीन बंद असल्याने रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत होता. बाहेरच्या खासगी केंद्रांवर महागात ‘सिटी स्कॅन’ करावे लागत असल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी आर्थिक व मानसिक हेळसांड होत होती. अखेर रुग्णालय प्रशासनाने प्रयत्न करून मशीन दुरुस्त केल्याने आता रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.


