टीम AM : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठी हालचाल सुरु झाली आहे. अनेक महिन्यांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आता राज्य निवडणूक आयोग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
बुधवारी (5 नोव्हेंबर) आयोग पत्रकार परिषद घेणार असून त्याच दिवशी राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या पत्रकार परिषदेतून राज्यातील 289 नगरपालिका, 32 जिल्हा परिषदा आणि 29 महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची अपेक्षा आहे. आयोगाकडून निवडणुकीची सर्व प्राथमिक तयारी पूर्ण करण्यात आली असून, प्रभाग आणि आरक्षणासंबंधी आवश्यक प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे.


