टीम AM : कोरडेवाडीतील ग्रामस्थांनी आज केज तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले. धर्मवीर संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्या राजश्री राठोड गेल्या सहा दिवसांपासून उपोषणाला बसल्या असून त्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.
बाळराजे आवारे पाटील यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चादरम्यान आंदोलकांनी तहसील कार्यालयाच्या आवारातचं बैलगाडीवर पेट्रोल टाकून ती पेटवून दिली. यावेळी घोषणाबाजी करत ग्रामस्थांनी आपला रोष व्यक्त केला.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या
कोरडेवाडी येथे साठवण तलाव मंजूर करावा, ज्ञानराधा बँकेच्या ठेवी परत द्याव्यात, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून प्रति हेक्टरी 50 हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी. या आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामस्थ व कार्यकर्त्यांचा सहभाग होता.



