टीम AM : स्वप्नं सत्यात उतरतात, जर त्यांना पूर्ण करण्याचा आपण मनापासून प्रयत्न केला तर ! ही गोष्ट आहे अमिता प्रजापतीची जिने लोकांचे टोमणे आणि आर्थिक संघर्षाला हरवून ‘सीए’ बनून सिद्ध करून दाखवलं आहे.
अमिताचे वडील चहा विकतात आणि त्यांच्याकडे राहण्यासाठी स्वतःचे घरही नाही. असे असूनही तिच्या पालकांनी अमिताचा अभ्यास कधीच थांबवला नाही किंवा तिला स्वप्न पाहण्यापासून रोखले नाही. काही लोकांनी तिच्या वडिलांना चहा विकून आपल्या मुलीला शिकविता येणार नाही, असे बोलून, तर काहींनी ‘झुग्गी झोपडी, उलटी खोपडी’ असे टोमणे मारले.
अमिता म्हणते, ‘लोक बोलत होते ते खरं होतं, जर ती उलटी खोपडी नसती तर आज आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो.’ तिच्या यशाचे पूर्ण श्रेय ती तिच्या आई – वडिलांच्या समर्पण आणि बलिदानाला देते, ज्यांनी तिला स्वप्न पाहण्याचे आणि ते पूर्ण करण्याचे स्वातंत्र्य दिले. आशा आहे, तुम्हालाही अमिताच्या कथेतून नक्कीच प्रेरणा मिळाली असेल !



