अंबाजोगाईत धनगर ‌एसटी आरक्षण ‌मोर्चा‌ : धनगर बांधव मोठ्या संख्येने सहभागी

उपजिल्हाधिकारी यांना दिले निवेदन 

टीमAM : धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश ‌करावा, या प्रमुख मागणीसाठी आज दिनांक ‌23 सप्टेंबर मंगळवार रोजी अंबाजोगाई शहरात धनगर ‌एसटी आरक्षण ‌मोर्चा‌ काढण्यात आला. शहरातील सकल धनगर समाजाच्या वतीने या मोर्चाचे‌ आयोजन करण्यात आले होते.

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून हा मोर्चा निघाला आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात ‘येळकोट येळकोट, जय मल्हार’ अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चातील विविध घोषणेने संपूर्ण शहर दणाणले होते. या वेळी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन ‌ देण्यात ‌आले. मोर्चात धनगर बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.