भीषण अपघात : भरधाव कंटेनरने सहा जणांना चिरडले : चार जणांचा जागीच मृत्यू, वाचा…

टीम AM : बीडमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कंटेनरने सहा जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. 

समोर आलेल्या माहितीनुसार, नामलगाव फाट्यावर ही दुर्दैवी घटना घडली. काही गावकरी देवदर्शनाला पायी निघाले होते. यावेळी एका भरधाव कंटेनरने त्यांना चिरडले. हा अपघात इतका भयंकर होता की, त्यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झालेत.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहेत. या अपघातातील जखमींवर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.