अंबाजोगाईकरांनो सावधान : मांडवा रोडवर बिबट्याची वर्दळ..!

टीम AM : अंबाजोगाई शहरालगतच्या मांडवा रोड परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रशांत अदनाक यांच्या शेताजवळ काल रात्री सुमारे 10.40 वाजता प्रवास करणाऱ्या एका युवकाला अचानक बिबट्या दिसला. या प्रसंगाने तो युवक हादरला मात्र त्याने धाडस करून मोबाईलवर बिबट्याचा थरारक व्हिडिओ कैद केला. 

हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

स्थानिक ग्रामस्थ व प्रवासी यांच्यात या घटनेनंतर भीतीचे सावट निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.