टीम AM : ‘शक्तिपीठ’ महामार्गाच्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे. ‘शक्तिपीठ’ महामार्गाच्या भूसंपादनाचा आदेश राज्य शासनाने पारित केला आहे. अधोरेखित करण्यासारखी गोष्ट म्हणजे कोल्हापूरला भूसंपादनाच्या आदेशातून वगळण्यात आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच महापालिका निवडणुकांच्या आधी फटका बसू नये याकरिता कोल्हापूरला वगळण्याची सावधगिरी शासनाने बाळगली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्यांबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत सरकार चर्चा करणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यावर चर्चा करणार आहेत. भूसंपादनासाठी राज्य शासनाने 20 हजार 787 कोटी मंजूर केले आहेत.
‘शक्तिपीठ’ महामार्गात ‘ही’ देवस्थाने जोडली जाणार
केळझरचा गणपती, कळंबचा गणपती, सेवाग्राम, पोहरादेवी, माहूरगड शक्तीपीठ, तख्त सचखंड गुरुद्वारा, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, अंबाजोगाई शक्तिपीठ, तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट, सांगलीतील औदुंबर दत्त मंदिर, नरसोबाची वाडी, जोतिबा देवस्थान, महालक्ष्मी मंदिर, संत बाळूमामा यांचे समाधिस्थान आदमापूर, कुणकेश्वर आणि पत्रादेवी ही देवस्थाने जोडली जाणार आहेत.



