राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार : खबरदारी घेण्याचं आवाहन, वाचा…

टीम AM : राज्यात मागील आठवड्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला होता. पूरपरिस्थिती, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान आणि जनजीवन विस्कळीत करणाऱ्या या पावसानंतर आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने (IMD) धोक्याचा इशारा दिला आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, 26 ते 29 ऑगस्ट 2025 दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पावसामुळे पुन्हा एकदा पूर, वाहतूक कोंडी आणि शेतीचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे.