टीम AM : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिव यांच्या 12 जून 2025 रोजीच्या आदेशानुसार बीड जिल्हा परिषदेच्या 61 निवडणूक विभाग आणि त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या 122 निर्वाचक गणांसाठी निवडणूक प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
यामध्ये गेवराई -18, माजलगाव -12, वडवणी – 04, बीड -16, शिरुर कासार – 08, पाटोदा – 06, आष्टी – 14, केज -14, धारुर – 06, परळी – 12 आणि अंबाजोगाई – 12 अशा निवडणूक प्रभागांचा समावेश आहे.
या अनुषंगाने अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना आज दि. 22 ऑगस्ट 2025 रोजी शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार असून ती जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, सर्व उपविभागीय, तहसील व पंचायत समिती कार्यालयांतील फलकांवर नागरिकांच्या अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व संबंधितांनी अंतिम प्रभाग रचनेचे अवलोकन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे.



