राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’ : पाच दिवस आधीच होणार पगार, वाचा…

टीम AM : राज्यातील शासकिय अधिकारी, कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक यांच्यासाठी शासनाने खुशखबर दिली आहे. गणेशोत्सव सणाचा उत्साह आणि गणेशोत्सवाची धूम लक्षात घेता ऑगस्ट महिन्याचा पगार 5 दिवस आधीच बँक खात्यात जमा केला जाणार आहे. 

गणेशोत्सवाच्या काळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन 26 ऑगस्ट रोजीच देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे, साहजिकच सरकारी नोकरदारांचा गणेशोत्सावाचा आनंद द्विगुणीत झाला आहे.   

गणेशोत्सव काळात खर्चासाठी खिसा गरम आणि हात ढिला होणार आहे. दरम्यान, गणेशोत्सवात बाप्पांच्या आगमनाची आतुरता घरोघरी पाहायला मिळते, त्यासाठी मंडप सजावट ते गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. अधिक खर्च करत भाविक सेलिब्रेशन करतात. त्यामुळेच, सरकारने 5 दिवस आधीच पगार देण्याचा निर्णय घेतला आहे.