मंत्रिमंडळ बैठक : पोलिसांची तब्बल 15 हजार पद भरण्यास मंजुरी, सामाजिक न्याय विभागासाठी महत्वाचा निर्णय, वाचा…

टीम AM :  तरूणांचं पोलीस होण्याचं स्वप्न अखेर प्रत्यक्षात उतरणार असून, राज्य सरकारने थोडी थोडकी नव्हेत तर, तब्बल 15 हजार पद भरण्यास मंजुरी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आजच्या बैठकीत पोलीस भरतीसह अन्य तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील हजारो तरुणांची गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली प्रतिक्षा आज अखेर संपली आहे. आज मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल 15 हजार पोलीस भरतीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील पोलिस दलात तब्बल 15 हजार नवीन भरतींना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज, मंगळवार दि. 12 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय मंत्रिमंडळाने आणखी चार महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

मंत्रिमंडळ बैठकीतील चार महत्त्वाचे निर्णय 

  1. अन्न, नागरी पुरवठा विभाग : राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरण.
  2. विमानचालन विभाग : सोलापूर – पुणे – मुंबई हवाई प्रवासाकरिता Viability Gap Funding निधी देण्याचा निर्णय.
  3. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जामीनदाराच्या अटी शिथिल. शासन हमीस पाच वर्षासाठी मुदतवाढ.
  4. गृह विभाग : महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे 15,000 पोलिस भरतीस मंजुरी.