बीड येथे स्वातंत्र्य दिनाचे मुख्य ध्वजारोहण अजित पवार यांच्या हस्ते, वाचा…

टीम AM : बीड जिल्ह्यातील स्वातंत्र्य दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण येत्या 15 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडणार आहे. राज्य शासनाने जिल्हानिहाय ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्यांची यादी आज जाहीर केली असून, त्यानुसार बीडची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील मुख्य समारंभासाठी बीड जिल्हा प्रशासनाने तयारीला सुरुवात केली आहे. यावेळी पोलीस दलाची सलामी, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्हे देण्याचा कार्यक्रम होणार आहे. स्वातंत्र्य दिनाचा हा सोहळा उत्साहात व शिस्तबद्ध पार पडण्यासाठी बीड जिल्हा प्रशासनाकडून विशेष नियोजन केले जात आहे.