स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‌दिवाळीनंतर, वाचा…

टीम AM : महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका दिवाळीनंतर ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्याच्या दरम्यान घेतल्या जातील. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी यासंदर्भात माहिती देत सांगितले की, या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट मशीनचा वापर न करता केवळ ईव्हीएमद्वारे मतदान होणार आहे.

सध्या राज्यात ईव्हीएम यंत्रांची कमतरता असल्याने इतर राज्यांकडून यंत्रे मागवण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवडणूक प्रक्रिया दिवाळीनंतर, ऑक्टोबर 2025 च्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here