टीम AM : अंबाजोगाई शहरात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतचं चालल्या असून अज्ञात चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या चार ठिकाणी दुकाने फोडून ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे.
ही सर्व ठिकाणे वर्दळीच्या भागात असूनही चोरट्यांनी निर्भीडपणे हात साफ केल्याने खळबळ उडाली आहे. नगर परिषदेसमोर असलेल्या मुख्य रस्त्यावरील पॅराडाईज वाईन शॉप, प्रशांत नगरमधील डॉ. तट यांचा दाताचा दवाखाना व बनाळे यांचे किराणा दुकान, तसेच कलावती हॉस्पिटल खालील मेडिकल स्टोअर अशी चार ठिकाणे या चोरट्यांनी लक्ष्य केली. या चोऱ्यांमध्ये नेमका कितीचा ऐवज चोरीला गेला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा अधिक तपास अंबाजोगाई पोलीस करित आहेत.